“विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्ट बांधकामाची परंपरा जपत पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘वेंकटेश बिल्डकॉन’ने २५ वर्षांत सहा हजारांहून अधिक घरांची निर्मिती केली, हे अभिमानास्पद आहे. आता वेंकटेश बिल्डकॉनने ‘सेरेनिक’ आणि इतर प्रकल्पांच्या माध्यमातून दहा हजार घरांचे उद्दिष्ट ठेवून काम करावे आणि आपले नाव पुण्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरावे,” असे प्रतिपादन मगरपट्टा टाउनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष आणि ‘क्रेडाई’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी येथे नुकतेच केले.
वेंकटेश बिल्डकॉनच्या बावधन येथील चांदणी चौकाजवळ उभारण्यात येणाऱ्या ‘वेंकटेश सेरेनिक’ या नवीन निवासी प्रकल्पाचा प्रारंभ आणि दालनाचे उद्घाटन सतीश मगर यांच्या हस्ते नुकतेच झाले.
या वेळी व्यासपीठावर आमदार भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, किरण सामंत, माजी आमदार अतुल बेनके, कुमार गोसावी, चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, अल्पना वर्षे, रूपाली पवार, विराज भरणे, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे संस्थापक एस. आर. कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, वेंकटेश बिल्डकॉनचे सीएमडी अंकुश आसबे, लहुराज आसबे, अरुण राजवाडे, हेमंत गोसावी आदी उपस्थित होते.
अंकुश आसबे यांनी ‘वेंकटेश सेरेनिक’ हा प्रकल्प १० एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर दोन टप्प्यांत विकसित होत असून त्यापैकी ३.७५ एकर क्षेत्रफळावर पहिल्या टप्प्यात २८ मजली ३ टॉवर, त्यात २ आणि ३ बीएचकेचे एकूण ५५० सदनिका आणि १३ शोरूम्सचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पात सुमारे ४० हजार चौरस फुटांच्या इनडोअर आणि आउटडोअर सुविधांसह सहा स्तरांवर पार्किंगची व्यवस्था आहे. स्वीमिंग पूल, व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याची जागा, योग आणि ध्यानधारणेसाठी स्वतंत्र जागा,
को-वर्किंग लाउंज तसेच हिरव्यागार मोकळ्या जागा आदी सुविधांचा यात समावेश आहे. संचालक अरुण राजवाडे यांनी आभार मानले. आरजे अक्षय यांनी सूत्रसंचालन केले.



