वेंकटेश बिल्डकॉनच्या बावधन येथील ‘वेंकटेश सेरेनिक’ नवीन निवासी प्रकल्पाचा शुभारंभ

वेंकटेश बिल्डकॉनने दहा हजार घरांचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम करावे : सतीश मगर

वेंकटेश बिल्डकॉनच्या बावधन येथील ‘वेंकटेश सेरेनिक’ नवीन निवासी प्रकल्पाचा शुभारंभ

पुणे : विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्ट बांधकामाची परंपरा जपत पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘वेंकटेश बिल्डकॉन’ने अवघ्या २५ वर्षांत सहा हजारहून अधिक घरांची निर्मिती केली, हे अभिमानास्पद आहे. आता वेंकटेश बिल्डिकॉनने ‘सेरेनिक’ आणि इतर प्रकल्पांच्या माध्यमातून दहा हजार घरांचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम करावे आणि आपले नाव पुण्याच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरावे, असे गौरवोद्गार मगरपट्टा टाउनशिप प्रकल्पाचे चेअरमन आणि  ‘क्रेडाई’चे  माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी काढले.

वेंकटेश बिल्डकॉनच्या बावधन येथील चांदणी चौकाजवळ उभारण्यात येणाऱ्या ‘वेंकटेश सेरेनिक’ या नवीन निवासी प्रकल्पाचा शुभारंभ आणि सेल्स ऑफिसचे उद्घाटन सतीश मगर यांच्या हस्ते रविवार, ११ ऑक्टोबर रोजी पार पडले. यावेळी प्रकल्पाच्या माहितीपुस्तिकेचेही अनावरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर आमदार भीमराव तापकीर, आमदार शंकर मांडेकर, आमदार किरण सामंत, माजी आमदार अतुल बेनके, माजी आमदार कुमार गोसावी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, नगरसेविका रुपाली पवार, युवानेते विराज भरणे, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे  संस्थापक एस. आर. कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, वेंकटेश बिल्डकॉनचे सीएमडी अंकुश आसबे, लहूराज आसबे, अरुण राजवाडे, हेमंत गोसावी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार तापकीर यांनी, नगरसेवक असल्यापासून वेंकटेश बिल्डिकॉन परिवाराशी आपला स्नेह असल्याचे सांगून, दर्जेदार बांधकाम, विचारपूर्वक नियोजन आणि ग्राहकांच्या जीवनात मोलाची भर घालणारी घरे निर्माण करण्याच्या उद्देशाने कंपनीने पुण्यातील बांधकाम क्षेत्रात आपली विश्वासार्ह ओळख निर्माण केल्याचे उद्गार काढले तर आमदार मांडेकर यांनी, मुळशीच्या प्रवेशद्वारावर होत असलेल्या नव्या प्रकल्पांमुळे या भागाला वेगळी उंची प्राप्त होत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक करताना वेंकटेश बिल्डकॉनचे सीएमडी अंकुश आसबे यांनी, ‘वेंकटेश सेरेनिक’ हा प्रकल्प 10 एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर दोन टप्प्यांत विकसित होत असून त्यापैकी ३.७५ एकर क्षेत्रफळावर पहिल्या टप्प्य्मध्ये मध्ये २८ माजली ३ टॉवर्स त्यामध्ये २ आणि ३ बीएचकेचे ऐकून ५५० सदनिका आणि १३ शोरूम्सचे नियोजननियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पामध्ये सुमारे ४०,००० चौरस फुटांच्या इनडोअर आणि आउटडोअर सुविधांसह सहा स्तरांवरील पार्किंगची व्यवस्था नियोजित आहे. स्विमिंग पूल, व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याची जागा, योग आणि ध्यानधारणेसाठी स्वतंत्र जागा, को-वर्किंग लाउंज तसेच हिरव्यागार मोकळ्या जागा अशा विविध सुविधांचा यात समावेश आहे. निसर्गरम्य परिसर, एनडीए हिल्सचे विहंगम दृश्य आणि शहराशी उत्तम जोडणी यांचा सुरेख मेळ साधण्याचा या प्रकल्पाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ‘वेंकटेश सेरेनिक’ प्रकल्पात पहिल्या  बुकिंग करणाऱ्या पाच ग्राहकांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक, कर्मचारी उपस्थित होते. संचालक अरुण राजवाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे अक्षय यांनी केले.

Share

Recent News & PR

Scroll to Top